युकेच्या एका कंपनीने फक्त एका जागेसाठी अर्ज सोडले आणि त्या एका जागेसाठी 183 लोकांनी अप्लाय केले. परंतु कंपनीच्या मालकाला तेव्हा खूप वाईट वाटले, जेव्हा या सर्व लोकांमधून त्याला 177 लोकांचे अर्ज रिजेक्ट करावे लागले. कारण अर्ज करणाऱ्यांनी जाहिरात न वाचताच अर्ज केले होते आणि कंपनीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी व्यवस्थित दिलेले नव्हते.
समाचार इन: सध्या रोजगार कमी आणि बेरोजगार जास्त अशी स्थिती फक्त भारतात नव्हे तर विदेशात ही पाहायला मिळत आहे. मात्र, भारतात त्याचे प्रमाण जरा जास्त आहे हे देखील तितकंच खरं.
अशातच एक बातमी समोर येत आहे की, युकेच्या एका कंपनीने फक्त एका जागेसाठी अर्ज सोडले आणि त्या एका जागेसाठी 183 लोकांनी अप्लाय केले. परंतु कंपनीच्या मालकाला तेव्हा खूप वाईट वाटले, जेव्हा या सर्व लोकांमधून त्याला 177 लोकांचे अर्ज रिजेक्ट करावे लागले. कारण अर्ज करणाऱ्यांनी जाहिरात न वाचताच अर्ज केले होते आणि कंपनीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी व्यवस्थित दिलेले नव्हते.
आपल्या मनाप्रमाणे नोकरी शोधणे, पाहिजे तितके सोपे नसते. कारण काही कंपन्यांमध्ये चांगला पगार मिळतो परंतु इतर सुविधा मिळत नाहीत आणि जर सुविधा चांगल्या मिळाल्या तर मनाप्रमाणे पगार मिळत नाही. या व्यतिरिक्त अनेक वेळा तर असेही होते की, पगार आणि सुविधा दोन्ही व्यवस्थित मिळतात परंतु येथील वातावरण अधिक काळपर्यंत नोकरी करण्यासाठी योग्य नसते आणि जिथे सर्व काही सुस्थितीत असते तिथे जागाच निघत नाहीत आणि निघाल्या तर तिथे एका पोस्टसाठी करोडो लोक अप्लाय करतात. अशाच तर काहींचे अर्ज आधीच रिजेक्ट केले जातात तर काही लोक मुलाखतीमध्ये नापास होतात. अशातच एक विचित्र प्रकरण समोर आले आहे, ज्याने लोकांना आश्चर्यचकित केले आहे.
या प्रकरणाबद्दल आपण जाणून घेऊया; प्रकरण असे होते की युकेमधील एका बड्या कंपनीने फक्त एका रिक्त जागेसाठी लोकांकडून अर्ज मागवले होते. कंपनीने जाहीर केलेल्या या आवेदनात काही प्रश्न देखील विचारले होते ज्यांची उत्तरं अर्ज करणाऱ्यांना आवेदनासोबतच पाठवायचे होते. परंतु झाले असे की, एकूण 183 अर्जांपैकी 177 अर्जदारांना कंपनीला नाईलाजाने रिजेक्ट करावे लागले. याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने विचारलेल्या अतिशय सोप्या प्रश्नांकडे अर्जदारांनी लक्षच दिले नाही. परिणामी त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले.
बॉसने 177 अर्ज केले रिजेक्ट
एका रिपोर्टनुसार, कंपनीचे नाव आरआयवेब आहे, जी एक इंटरनेट सर्विसेस कंपनी आहे. रेयान इरविंग या कंपनीचे बॉस आहेत, त्यांनीच अर्ज मागवले होते. रेयान यांनी सांगितले की, त्यांच्याजवळ सुमारे 183 लोकांचे अर्ज आले होते. ज्यामधील 177 अर्जांना त्यांना रिजेक्ट करावे लागले. त्यांचे हे म्हणणे होते की, जर लोक छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतील तर त्यांना नोकरीवर ठेवण्यात काहीही अर्थ नाही. रेयान यांनी सांगितल्याप्रमाणे केवळ सहा लोकांनीच मुलाखत दिली होती. त्या सहा लोकांमध्ये कोणाला सिलेक्ट करण्यात आले याबाबत माहिती त्यांनी दिली नाही, पण त्यांचे म्हणणे होते की, अर्जदारांनी नोकरीसाठी जी जाहिरात देण्यात आली होती, ती जाहिरात व्यवस्थित वाचलेली नव्हती.
एक लाख रुपयांपेक्षा अधिक होता पगार
रेयान यांनी आपली नाराजी लिंक्डिनपर वर व्यक्त केली असून यांनी सांगितले की, या पोस्टवर काम करणाऱ्या उमेदवाराला 12 लाख 75 हजार रुपयांचे वार्षिक पॅकेज देण्यात येत होते. त्यांनी लोकांना सल्ला दिला आहे की, कोणत्याही ठिकाणी नोकरीसाठी जेव्हा आपण अर्ज करता तेव्हा संबंधित जाहिरात ही व्यवस्थितरित्या वाचावी आणि कंपनीने तुमच्याकडे ज्या प्रश्नांची उत्तरे मागवली आहेत ती काळजीपूर्वक द्यावीत. जेणेकरून एका चांगल्या नोकरीपासून तुम्ही वंचित राहू शकणार नाहीत.