Abraham Ozler OTT Streaming: ओटीटीवर आणखी एक मल्याळम ‘क्राईम थ्रिलर’, कुठं पाहायचा? जाणून घ्या..

Abraham Ozler OTT Streaming

समाचार इन: “अब्राहम ओझलर” हा चित्रपट या वर्षाच्या सुरुवातीला मल्याळम सिने सृष्टीत पहिला हिट चित्रपट ठरला होता. ज्याला चाहत्यांनी उदंड प्रतिसाद देऊन भरभरून प्रेम दिले. मिधुन मॅन्युएल थॉमस दिग्दर्शित या थ्रिलर चित्रपटात जयरामने मुख्य भूमिका साकारली होती.

जयराम आणि दिग्गज मामूट्टी अभिनित या मल्याळम थ्रिलर “अब्राहम ओझलर”ने 11 जानेवारी 2024 रोजी थिएटर मध्ये पदार्पण करून खळबळ उडवली होती. हा चित्रपट चाहत्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहण्याची उत्सुकता होती. आज ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर अधिकृतपणे हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट सुरू झाला आहे.

अब्राहम ओझलर डिस्ने प्लस हॉटस्टारवर मल्याळम, तेलुगु, हिंदी, तमिळ आणि कन्नड मध्ये इंग्रजी सब टायटलसह स्ट्रीम करण्यासाठी उपलब्ध आहे. मल्याळम मेगास्टार मामूट्टीची देखील अब्राहम ओझलर मध्ये मुख्य भूमिका आहे. ज्यांनी चित्रपटगृहात हा चित्रपट पाहिला नसेल, त्यांच्यासाठी ही एक अतिशय उत्तम अशी संधी ठरणार आहे.

जयरामने “अब्राहम ओझलर”द्वारे मल्याळम चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर करण्यासाठी पुन्हा एकदा पुनरागमन केले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली असून या चित्रपटाच्या उत्तुंग यशानंतर असंख्य चाहते है चित्रपटाच्या डिजिटल रिलीजची वाट पाहत होते. मनोरंजक कथा आणि जयराम व मामूट्टी यांच्या अभिनयाला प्रेक्षक आता घरी बसून दाद देण्यास सज्ज झाले आहेत.

मिधुन मॅन्युएल थॉमस दिग्दर्शित हा चित्रपट जयरामचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट असून यामध्ये अनश्वरा राजन, अर्जुन अशोकन, अनुप मेनन, आर्या सलीम, सैजू कुरूप आणि सेंथिल कृष्णा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती इर्शाद एम. हासन आणि मिधुन मॅन्युएल थॉमस यांनी त्यांच्या कंपनी नेरांबोक्कू आणि मॅन्युएल मूव्ही मेकर्सद्वारे केली होती.

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे पण नक्की बघा :