अजित पवारांचं छत्रपती संभाजी महाराजांबद्दल चुकीचं वक्तव्य; फडणवीसांनी लगेचंच सावरलं.. मागितली ‘माफी’

पुणे: शनिवारी वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या परिसरातील विकासकामांच्या भूमिपूजनाच्या वेळी अजित पवारांनी एक नवा वाद ओढवून घेतला. भाषणाच्या दरम्यान अजित दादा यांच्या तोंडून चुकीचा शब्द बाहेर आला. तेव्हाच स्टेजवर उपस्थित असणारे देवेंद्र फडणवीस यांनी लगेच ही चूक त्यांच्या लक्षात आणून देत आपला शब्द मागे घेण्यासाठी सांगितले. अजित दादांनी लगेचच उपस्थित लोकांची माफी मागितली आणि फडणवीस यांचे आभार मानले.

अजित दादा पवार आपल्या भाषणातून करत असलेल्या वक्तव्यांमुळे फेमस आहेत. बोलताना ते सहजपणे काहीतरी बोलून जातात. परंतु यामुळे लोकांच्या भावना दुखावत असतात. परंतु चूक लक्षात आल्यावर ते माफी मागण्यातही मागे राहत नाहीत आणि जाहीरपणे आपली चूक मान्य करून विषयावर पडदा टाकतात.

अशातच दादांनी काल भाषणात म्हटलं की, छत्रपती संभाजी महाराज हे एकही निवडणूक हरले नाहीत. मुळात त्यांना संभाजी महाराज हे आपल्या आयुष्यात एकही लढाई हरले नाहीत असे म्हणायचे होते. परंतु सध्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. त्यामध्ये लढाई ऐवजी निवडणूक बोलले गेले असे म्हणत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

अजित पवार म्हणाले, “लोकसभेच्या निवडणुका आल्या असल्याने निवडणुकांशिवाय दुसरं काही सुचत नाही, परंतु आमच्यामध्ये एक निष्णात असे देवेंद्र फडणवीस आहेत. असं काही झालं की लगेच तिथल्या तिथे चूक लक्षात आणून देतात. धन्यवाद देवेंद्रजी.. अशाच नेहमी गोष्टी लक्षात आणून देत जा.” असे म्हणत वापरल्या गेलेल्या शब्दामुळे त्यांनी माफी मागितली आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक होण्यासाठी राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही असे आश्वासन दिले.

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे पण नक्की बघा :