समाचार इन: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे छोटे चिरंजीव अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन ०३ मार्चला गुजरातच्या जामनगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सिने कलाकारांच्या उपस्थितीत रंगलेल्या या कार्यक्रमात बॉलीवूड पासून हॉलिवूड पर्यंतचे दिग्गज कलाकार समाविष्ट झाले होते. हा कार्यक्रम ०१ मार्चपासून ते ०३ मार्चपर्यंत चालला. कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी अमिताभ बच्चनसह पूर्ण बच्चन कुटुंबीय देखील यावेळी उपस्थित होते.

सध्या या कार्यक्रमातील अभिषेक-ऐश्वर्या आणि आराध्या बच्चनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आराध्या आपले आई-वडिल आणि आजोबांचे सुपरहिट गाणे ‘कजरारे कजरारे..’ पर जागेवरच थिरकताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या देखील आराध्या सोबत थिरकत आहेत.

बच्चन कुटुंबीयांच्या लूक्स बद्दल बोलायचे झाले तर आराध्या पांढऱ्या अनारकली सूटमध्ये अतिशय मोहक दिसत होती तर ऐश्वर्या बेज रंगाच्या फ्लोअर लेन्थ अनारकली सलवार सूटमध्ये अतिशय सुंदर दिसत होती आणि अभिषेक बेज रंगाच्या कुर्त्यात खूपच हँडसम दिसत होता. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की त्यांनी अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग पार्टीचा मनमुरादपणे आनंद लुटला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *