Ban Vs SI: श्रीलंकेच्या विरुद्ध होत असलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात बांगलादेशचे तब्बल ४ खेळाडू जखमी झाले आहेत. दोघांना तर स्ट्रेचर वरून मैदानाबाहेर नेण्यात आले.
Bangladesh Four Players Injured During Third ODI Match:
समाचार इन: सध्या श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये तीन दिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. आज (दि.१८ मार्च) रोजी मैदानावर तिसरा सामना रंगात असताना बांगलादेशच्या १-२ नव्हे तर तब्बल चार खेळाडूंना गंभीर दुखापत झाली आहे. यापैकी दोन खेळाडूंना स्ट्रेचरच्या साहाय्याने मैदानाच्या बाहेर घेऊन जाण्यात आले इतकी गंभीर जखम त्यांना झाली आहे. विशेष म्हणजे केवळ ३ षटकांमध्येच ४ खेळाडू गंभीर जखमी होऊन मैदानाबाहेर जाणे ही घटना बांगलादेशसाठी खूप धोकेदायक ठरली आहे.
कोण आहेत हे जखमी खेळाडू?
गंभीर जखमी झालेल्या या खेळाडूंमध्ये मुस्तफिझूर रहमान आणि जेकर अली यांचा समावेश आहे. यापैकी जेकर अली याला झालेली जखम ही गंभीर आहे. तसेच अनामुकल हक आणि सौम्या सरकार असे या चार खेळाडूंची नावे आहेत.
मैदानात नेमकी झाले तरी काय?
आज खेळल्या गेलेल्या या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये बांगलादेशचा डावखुरा गोलंदाज मुस्तफिझूर रहमानच्या हाताला ४८ व्या षटकात अचानक चमक भरली आणि त्याचा हात प्रचंड दुखू लागला. दरम्यान त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले. त्यानंतर यष्टीरक्षक जेकर अली ला देखील ५० व्या षटकात दुखापत झाली. जेकर अली आणि अनामुकल हक यांच्यात झेल घेताना जोरदार टक्कर झाली आणि यामुळे दोघांनाही दुखापत झाली. यामध्ये जेकर अलीस गंभीर जखम झाल्याने त्यालाही स्ट्रेचरवर मैदानातून नेण्यात आले.
मुस्तफिझूर रहमान आणि जेकर अली यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना थेटर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान सौम्या सरकार चौकार अडविण्याच्या नादात जाहिरात फलकावर जोरदार आदळल्याने त्याला देखील किरकोळ जखम झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या मानेला दुखापत झाली आहे.
या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेश विरुद्ध खेळताना प्रथम फलंदाजी करत ५० षटकांमध्ये २३५ धावा रचल्या. बांगलादेश कडून तस्कीन अहमद ने सर्वाधिक तीन बळी घेतले. या तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना हा बांगलादेशने जिंकला आहे तर श्रीलंकेने दुसरा सामना आपल्या नावे केला आहे.