समाचार इन: तुम्हाला वजन कमी करायचं आहे का? आणि यासाठी तुम्ही अनेक उपाय देखील करून पाहिले आहेत का? तसं असल्यास, ही माहिती तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कारण वजन कमी करण्यासाठी एका तज्ज्ञानं एक अतिशय अनोखा उपाय सुचवला आहे आणि तोही अगदी अनोख्या पद्धतीनं. या तज्ज्ञानं कॉफी हे वजन कमी करण्याचं साधन असल्याचं मत व्यक्त केलं आहे, परंतु त्यासोबत एका विशेष गोष्टीचं मिश्रण करण्याचा सल्ला देखील दिला आहे.
अनेक देश असं करत आहेत
या गोष्टीबद्दल, या ब्रिटिश लाईफ स्टाईल लेखकानं सांगितलं आहे की, ही वस्तू सहसा केक आणि पेस्ट्रीमध्ये आढळते आणि तरीही ब्रिटनचे लोक ते स्वीकारत नाहीत. ही वस्तू शेकडो वर्षांपासून कॉफीमध्ये वापरली जात आहे आणि इथिओपिया, येमेन, सिंगापूर, व्हिएतनाम आणि तिबेट यांसारख्या अनेक देशांमध्ये अजूनही वापरली जाते.
भारताच्या काही भागात देखील आढळते
या लेखकानं तर असं ही म्हटलं आहे की, भारतातील अनेक भागांमध्ये अशा पद्धतीनं कॉफी तयार केली जाते आणि वापरली जाते. लेखक म्हणतात की कॉफीनं वजन कमी करण्यासाठी तुम्हाला त्यात फक्त लोणी घालावं लागेल आणि त्यातनं अनेक प्रकारे मदत होऊ शकते. लोकांसाठी यावर विश्वास ठेवणं कदाचित कठीण असू शकतं परंतु त्याचे बरेच फायदे आहेत.
या लेखकानं त्याचे फायदेही सांगितले आहेत. मिरर वेबसाइटच्या या लेखात नमूद केलेल्या त्याच्या फायद्यांपैकी, सर्वप्रथम हे सांगितलं गेलं आहे की त्यात लोण्यातील सर्व आवश्यक जीवनसत्त्वे आहेत आणि सोबतच कॅल्शियम चयापचयसाठी व्हिटॅमिन के2 देखील आहे. कॅफिन आणि फॅटच्या मिश्रणामुळे ऊर्जा मिळते.
हे देखील फायदे
यामुळं कॉफीच्या अधिक सेवनामुळं होणारं नुकसानही कमी होतं, असं सांगण्यात आलं आहे. जे लोक केटोजेनिक आहार घेतात म्हणजेच त्यांचे केटोसिस टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात, लोणीतील चरबी अशा लोकांना मदत करते; जिथं शरीर कर्बोदकांऐवजी चरबीचा इंधन म्हणून वापर करतं. यामुळे भुकेची भावना देखील दूर होते.
या प्रकारच्या कॉफीमधून अधिकाधिक फायदे मिळविण्यासाठी, तुम्हाला एक चमचा मिठाचं प्रमाण नसलेलं उच्च दर्जाचं लोणी घ्यावं लागणार आणि त्याला फिल्टरच्या ब्लॅक कॉफीमध्ये टाकावं लागेल. कॉफीमध्ये दूध घालणं ऐच्छिक आहे आणि तुम्ही किती स्ट्रॉंग कॉफी घेता यावर देखील ते अवलंबून आहे.
Disclaimer: हा लेख केवळ आपल्या सर्वसाधारण माहितीसाठी आहे, व्यक्तिगत सल्ला नाही. त्यामुळं कोणत्याही गोष्टीचा उपयोग करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.