डीएमकेच्या नेत्याने हे देखील म्हटले की, “भारत एक देश नाही तर एक उपमहाद्वीप आहे. एक देश म्हणजे एक भाषा, एक परंपरा आणि एक संस्कृती असते. जर एखादा समुदाय गोमांस खात असेल, तर ते स्वीकार करा. जर कोणी मणिपूरमध्ये कुत्र्याचे मांस खात असेल तर हे त्यांच्या संस्कृतीमध्ये आहे.”
समाचार इन: डीएमके चे खासदार ए राजाने मंगळवारी पुन्हा एकदा विवादास्पद वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले की, “तामिळनाडू भाजपाच्या जय श्रीराम आणि भारत मातेच्या विचारधारेला आम्ही कधीच स्वीकारणार नाहीत.” डीएमके खासदाराच्या या वक्तव्यानंतर भाजपा देखील आक्रमक झाली असून तामिळनाडूच्या सत्ताधारी पार्टीवर हल्ला करताना म्हटले की, “द्रमुक कडून चिथावणीखोर भाषणे सातत्याने सुरूच आहेत.”
अधिक माहिती म्हणजे, मदुराई मध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करताना माजी केंद्रीय मंत्र्यांनी भाष्य केले की, “तामिळनाडू भाजपाने सांगितलेल्या आधारावर राम किंवा भारत मातेला स्वीकारणार नाही. रामचे शत्रू कोण आहेत? माझ्या तामिळ शिक्षकांनी सांगितले की राम सीता समवेत वनात गेले. त्यांनी एका शिकारीला स्वीकार केले. त्यांनी सुग्रीव आणि विभीषण यांना देखील भावाच्या रुपात स्वीकारले. तेथे कोणतीही जात किंवा पंथ नव्हता. मी रामायण आणि रामावर विश्वास ठेवत नाही, पण मी कंबरमायनम (TAMIL DIALECT RAMAYANA) मधून उद्धृत करत आहे.”
डीएमकेच्या नेत्याने हे देखील म्हटले की, “भारत एक देश नाही तर एक उपमहाद्वीप आहे. एक देश म्हणजे एक भाषा, एक परंपरा आणि एक संस्कृती असते. जर एखादा समुदाय गोमांस खात असेल, तर ते स्वीकार करा. जर कोणी मणिपूरमध्ये कुत्र्याचे मांस खात असेल तर हे त्यांच्या संस्कृतीमध्ये आहे. तुमची अडचण काय आहे? त्यांनी तुम्हाला खाण्यास सांगितले का?” द्रमुक खासदार ने पुढे दावा केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की लोकसभा निवडणुकीनंतर तामिळनाडूमध्ये द्रमुक राहणार नाही. ते पुढे म्हणाले, “जर निवडणुकीनंतर डीएमके नसेल तर भारत ही नसेल.”
ए राजा यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री हरिष रावत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. ते म्हटले की, डीएमके चे नेते ए राजा यांचे वक्तव्य स्वीकारार्थ नाही. संविधानाची शपथ घेतात आणि भारत माता की जय म्हणत नाहीत, हे चालणार नाही. असे लोक भारताच्या संविधानाप्रती देखील प्रतीबद्ध नसतात. भारत माता, प्रभू रामचंद्र आणि सनातन धर्म हे राजकीय वक्तव्य आणि उद्देशांपेक्षा वरती आहेत.
‘जय श्री राम’ आणि भारत देशाबद्दल डीएमके नेता ए राजा यांनी केलेल्या विधानावर जगद्गुरु रामानुजाचार्य यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, “ए राजा यांना हा देखील विचार करावा लागेल की संपूर्ण देश हा ‘राम मय’ आहे. जर आपण प्रभू श्री रामांवर विश्वास ठेवत नसाल तर देशात आपल्याला कोण विचारेल? विवादास्पद वक्तव्य करण्याची जणू काही स्पर्धाच सुरू झाली आहे. दक्षिण भारतात रावणाची परंपरा आहे. रावणाला प्रभू श्रीराम समोर दिसायचे परंतु माझा रामावर विश्वास नाही असे रावण म्हणायचा, परंतु शास्त्र सांगते की रावणाने देखील शेवटचा श्वास घेताना “राम” म्हटले होते.
तामिळनाडू भाजपा अध्यक्ष के. अण्णामलाई यांनी देखील डीएमके नेत्याच्या विधानावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, डीएमके (DMK), हा पक्ष घराणेशाहीच्या राजकारणावर आधारित आहे आणि तो इंडिया (INDIA) ब्लॉकचा सदस्य आहे. अशा आघाड्या केवळ दोन सूत्री अजेंड्यावर चालतात. सर्वप्रथम तर आपल्या प्रमुखांना खुश करायचं जे की सनातन धर्माचा द्वेष करतात आणि मर्यादेपलीकडे लूट करतात. 2जी घोटाळ्याचे आरोपी डीएमके खासदार ए राजा सातत्याने सनातन धर्माचा अपमान करत तेच करत आहेत. आता तर ते एका चुकीच्या भावनेने पसरविण्यात आलेल्या सिद्धांताच्या माध्यमातून “जय श्री राम” आणि “भारत माता की जय” म्हणणाऱ्या प्रत्येक भारतीयाच्या भावनेला ठेस पोहोचविण्याच्या उद्देशाने एक पाऊल अजून पुढे सरसावले आहेत. निवडणुकीत आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करणाऱ्या आणि लोकांनी कष्टाने कमावलेल्या पैशातून त्यांची फसवणूक करणाऱ्या द्रमुकच्या नेत्यांना मूर्ख म्हणणेच योग्य ठरेल. तसेच द्रमुक हे आंतरराष्ट्रीय ड्रग माफियांचे अड्डे असल्याचेही वर्णन त्यांनी यावेळी केले आहे.