Election Date 2024: महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे? जाणून घ्या!

लोकसभा निवडणूक

मोदी सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास संपादन करण्यास यशस्वी ठरेल की मतदार महाविकास आघाडीसोबत जाऊन केंद्रात काँग्रेस पक्षाला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल हे आता जनता आणि येणारी वेळच ठरवेल.

समाचार इन: सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आज लोकसभा निवडणुकीच्या तारखा देखील जाहीर झाल्या असून या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक पक्षाने आपापल्या हालचाली सुरू केल्या आहेत. यात सत्तेत असणाऱ्या महायुती सरकारने तर विकासकामे मंजूर करणारी भली मोठी यादीच या दोन तीन दिवसांमध्ये राज्यासमोर ठेवली आहे. यातून मतदारांमध्ये काही फरक पडतो का हे पाहणे देखील तितकेच औत्सुक्याचे ठरणार आहे.

तसेच दुसरीकडे महाविकास आघाडीने देखील कंबर कसली असून महायुतीच्या विविध योजना या फसव्या कशा ठरल्या याच्या फैरी झाडल्या आहेत. एकूणच सर्व पक्षांनी आपापल्या विरोधकांना समोर ठेवून निशाणा साधायला सुरुवात केली आहे. या सर्व घडामोडींमध्ये नेमकं बाजी कोण मारणार हे पाहण्याची सर्वांनाच आतुरता लागली आहे.

मुळात एक मतदार म्हणून नागरिक देखील कोणत्या पक्षाने आपल्याला काय दिलं याचा सर्व विचार करून मतदान करू असे मत मांडत आहेत. तर दुसरीकडे विविध विकासकामे निवडणूक तोंडावर असताना का होईना मंजूर झालीत याबाबत काही लोक दिलासा व्यक्त करत आहेत.

तसेच राज्यातील पिएचडी धारक विद्यार्थ्यांनी मात्र राज्य सरकारला धारेवर धरले आहे. संशोधक विद्यार्थी गेल्या एक दीड वर्षापासून सरकारकडे फेलोशीप मिळावी यासाठी पदर पसरत आहेत. मात्र, त्यांच्या बाबतीत कुठलाही ठोस निर्णय न घेतल्यामुळे संशोधक विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी दिसून येत आहे. काहींनी तर पिएचडी सोडण्याचा निर्णय देखील घेतला आहे.

दरम्यान निवडणुकीच्या या ऐन वातावरणात आपल्या विकासकामांनी जनतेच्या मनावर कोणी अधिराज्य गाजवले हे येत्या काळात कळेलच, कारण मागील काळात महाविकास आघाडीकडे देखील सत्ता होती आणि आता महायुतीकडे देखील सत्ता आहे. त्यामुळे बऱ्याच पक्षांनी सत्ता उपभोगत राज्याच्या कारभारात जरी आपले योगदान दिले असेल, मात्र निवडणुका या लोकसभेच्या असल्यामुळे त्यांचा थेट संबंध हा केंद्राशी येतो. त्यामुळे मोदी सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास संपादन करण्यास यशस्वी ठरेल की मतदार महाविकास आघाडीसोबत जाऊन केंद्रात काँग्रेस पक्षाला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल हे आता जनता आणि येणारी वेळच ठरवेल.

या निर्णायक ठरणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे मतदान महाराष्ट्रात कुठे आणि केव्हा होणार या तारखा आपण जाणून घेऊया..

पहिला टप्पा – 19 एप्रिल: रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

दुसरा टप्पा – 26 एप्रिल: बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

तिसरा टप्पा – 7 मे: रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा – 13 मे: नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा – 20 मे: धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे पण नक्की बघा :