Energizer Hard Case P28K: ‘हा’ mobile एकदाच करा ‘चार्ज’ आणि 94 दिवस वापरा बिंधास्त!

Energizer Hard Case P28K

समाचार इन: सध्या मानवाच्या जीवनाचा मोबाईल हा अविभाज्य घटक बनला आहे. या डिजिटल युगात मोबाईल, कॉम्पुटर यासारख्या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून आज सर्वच कामे आपण त्यांच्या साहाय्याने चुटकीसरशी करत असतो. मात्र या सर्व गोष्टी करत असताना काही गोष्टींचा मर्यादा येत असतात. त्या मर्यादा म्हणजे आपल्या जवळ मोबाईल असला आणि त्याला जर वेळेवर चार्जिंग केले नाही तर त्याचा उपयोग हा शून्य होतो. त्यावर आता पर्याय म्हणून एक मोबाईल बाजारात आला आहे. त्याबद्दल जाणून घेऊयात..

मोबाईल कंपन्या नवनवीन फीचर्ससह आपले हँडसेट बाजारात आणत असतात. त्यामुळे लोकांच्या पसंतीस उतरणारे अनेक मोबाईल आपल्याला पाहायला मिळतात. अशातच एक असा मोबाईल आता समोर आला आहे की, ज्याला एकदा जर फुल्ल चार्ज केलं तर तो तब्बल 94 दिवस टिकतो. होय, बरोबर वाचलं. या मोबाईलला फक्त एकदा चार्ज करा आणि 94 दिवस चार्जरला विसरा. या मोबाईल चे नाव Energizer Hard Case P28K असे असून हा मोबाईल तब्बल 28,000mAh बॅटरीसह येतो. स्पेनमधील बार्सिलोना येथे आयोजित करण्यात आलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2024 (MWC 2024) कार्यक्रमात हा मोबाईल लाँच करण्यात आला.

मोबाईलचे फीचर्स काय आहेत?
Energizer Hard Case P28K मध्ये 6.78 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले आहे तर जम्बो बॅटरीसह MediaTec Helio G99 चिपसेट बसवण्यात आली आहे. सदरील मोबाईल हा 4G कनेक्टिव्हिटीसह येत असून कंपनीने 3 वर्षाची वॉरंटी देखील दिली आहे. तसेच 60 मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा तर 30 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच समोरील बजुल सेल्फी घेण्यासाठी आणि व्हिडिओ काढण्यासाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे कंपनीने बॅटरी संदर्भात हा दावा देखील केला आहे की, या जंम्बो बॅटरी पॅकसह 94 दिवसांचा स्टँडबाय बॅकअप आणि 122 तासांचा टॉकटाइम देण्यात येणार आहे. अर्थात एकदा चार्ज केल्यावर 122 तास तुम्ही समोरच्या व्यक्तीशी संवाद साधू शकणार आहात. सदरील स्मार्टफोन हा येत्या ऑक्टोबरमध्ये या कंपनीतर्फे लाँच करण्यात येणार असल्याची शक्यता असून या मोबाईलची किंमत 250 युरो म्हणजेच सुमारे 22,000 रुपये असण्याची शक्यता आहे. मात्र, Energizer कंपनी त्यांचे मोबाईल भारतात लाँच करत नाही. त्यामुळे सदरील स्मार्ट फोन हा भारतात उपलब्ध होणे शक्य नाही. परंतु येत्या काळात भारतीय बाजारपेठेत देखील हा स्मार्ट फोन येऊ शकतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे पण नक्की बघा :