ENG vs PAK इंग्लंडने चार सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत पाकिस्तानचा 2-0 ने पराभव केला आणि मालिका ताब्यात घेतली. पावसामुळे दोन सामने रद्द झाले. इंग्लंडच्या या विजयामुळे टी-20 विश्वचषकापूर्वी खेळाडूंचे मनोबल निश्चितच उंचावले आहे. त्यांच्या कामगिरीमुळे इंग्लंडला टी-20 विश्वविजेते पदासाठी प्रबळ दावेदार देखील मानले जात आहे.
समाचार इन: इंग्लंडले चार टी-20 सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली आहे. शेवटच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला. या मालिकेतील दोन सामने पावसामुळे रद्द झाले. टी-20 विश्वचषकापूर्वी इंग्लंडने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाने निश्चितच संघाचे मनोबल उंचावणार आहे यात कसलीही शंका नाही.
इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी पाकिस्तानला वेगवान सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 59 धावा जोडल्या. बाबरने 22 चेंडूत 36 धावा केल्या तर रिझवानने 16 चेंडूत 23 धावा केल्या. उस्मान खानने 38 धावा केल्या.
चार फलंदाजांनी आपले खाते देखील उघडले नाही
या तिघांशिवाय अनुभवी फलंदाज इफ्तिखार अहमदने 21 धावा आणि गोलंदाज नसीमने 16 धावांचे योगदान दिले. पाकिस्तानच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडा देखील गाठता आला नाही. यातील चार फलंदाजांना तर खाते देखील उघडता आले नाही आणि पाकिस्तानचा डाव 19.5 षटकात 157 धावांवरच मर्यादित राहिला. इंग्लंडकडून वुड, रशीद आणि लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले.
बटलर आणि सॉल्टची दमदार फलंदाजी
पाकिस्तानच्या 158 धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर आणि फील सॉल्ट यांनी आयपीएलचा फॉर्म कायम राखला आणि शानदार फलंदाजी केली. दोघांमध्ये 6.2 षटकात 82 धावांची भागीदारी झाली. फील सॉल्टने 24 चेंडूत 45 तर बटलरने 21 चेंडूत 39 धावा केल्या. विल जॅकने 20 धावांचे योगदान दिले.
हारिस रौफने घेतले तीन बळी
जॉनी बेअरस्टो आणि हॅरी ब्रूक यांनी संघाला सात विकेट्स राखून विजय मिळवून दिला. बेअरस्टो 28 आणि ब्रूक 17 धावा करून नाबाद परतले. इंग्लंडने 15.3 षटकात 158 धावा करत सामना जिंकला. पाकिस्तानकडून हारिस रौफ हा एकमेव यशस्वी गोलंदाज ठरला. रौफने 3.3 षटकात 38 धावा देत 3 बळी घेतले.