समाचार इन: फेसबुक आणि इंस्टाग्राम सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरताना अनेक युजर्सना अडचणी येत आहेत. खरंतर मंगळवारी रात्री (५ फेब्रुवारी २०२४) अचानक फेसबुक आणि इंस्टाग्राम बंद झाले. अनेकांचे अकाउंट्स आपोआपच लॉग आऊट होत आहेत.
लोकांना आपले अकाउंट लॉग इन करता येत नाही आहे. असंख्य युजर्स हे काळजीत पडले आहेत. यासंबंधित अनेक लोकांनी तक्रार देखील नोंदवली आहे.
Meta's Facebook & Instagram are down in India and many other parts of the world. More details awaited.
— ANI (@ANI) March 5, 2024
सायबर तज्ज्ञांच्या मते, हा D DOS ॲटॅक देखील असू शकतो, असे गृहीत धरले जात आहे. यामध्ये असंख्य लोक हे एकाचवेळी सर्व्हरवर लॉग इन करण्याचा प्रयत्न करतात जे त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त आहे. यामध्ये जास्तीच्या संख्येत फेक युजर्स असतात. हे बॉट्स कॉम्पुटर रोबोट असतात.