‘या’ दिग्गज खेळाडूनं सक्रिय राजकारणातून घेतला संन्यास! ट्विट करत सांगितलं- ‘क्रिकेटकडे करायचंय लक्ष केंद्रित’

gautam gambhir (file photo)

समाचार इन: Gautam Gambhir Quits Politics: दिल्लीच्या पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश करून सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता.

सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र घुमत असतांनाच गौतम गंभीर यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. आज शनिवारी सकाळच्या दरम्यान त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे एक्स (X) वरील त्यांच्या अधिकृत हँडलवर पोस्टद्वारे लिहिले की, ‘मी पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना विनंती केली आहे की मला माझ्या राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्यात यावे, जेणेकरून मी माझ्या आगामी क्रिकेट क्षेत्रातील कार्तव्यांना योग्य तो न्याय देऊ शकेल. मला लोकांची सेवा करण्याची महत्वाची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद!

गौतम गंभीर हे पूर्व दिल्ली येथून खासदार आहेत. भाजपा दिल्लीमध्ये यावेळी नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे बोलावले जातात आहे. त्यामुळे युवा वर्ग आणि महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे असे समोर येत आहे की, गंभीर यांचे तिकीट रद्द होऊ शकते. तथापि, तिकीट नाकारण्याआधीच गौतम गंभीरने राजकारणातून संन्यास घेतला आहे.

निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वी भाजपाला मोठ्या संख्येने उमेदवार जाहीर करायचे आहेत. लोकसभेच्या निवडणूका एप्रिल-मे मध्ये होण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची नावे निश्चित कारण्यासाठी आयोजित केलेल्या मॅरेथॉन बैठकीत भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीने (CEC) सुमारे १६ राज्यांच्या नावांवर चर्चा केली आहे.

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे पण नक्की बघा :