Google Doodle celebrates nowruz 2024: नवरोज म्हणजे काय? कुठे केला जातो साजरा, जाणून घ्या..

Google Doodle celebrates nowruz 2024

Google Doodle celebrates nowruz 2024: नवरोज (nowruz 2024) हा इराणी नवीन वर्षाचा सण आहे. जो, की वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या मुहूर्तावर आणि पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

समाचार इन: आज गुगल एका खास डूडल (Google Doodle) च्या माध्यमातून नवरोज चा सण साजरा करत आहे. आज गुगल डूडल मध्ये एक पेंटिंग केलेले झाड दिसत आहे. नवीन वर्षाच्या अनुषंगाने इराणी आणि पर्शियन समाजामध्ये नवरोज चा सण साजरा केला जातो. मिळालेल्या माहितीप्रमाणे हा सण सुमारे 3000 वर्ष जुना असल्याचे मानले जाते.

Google Doodle: संयुक्त राष्ट्रात या सणाचे महत्त्व

संयुक्त राष्ट्रांनी नवरोज सणाला आंतरराष्ट्रीय सुट्टी म्हणून मान्यता दिली आहे. कारण मध्य पूर्व, दक्षिण काकेशस, ब्लॅक सी बेसिन आणि उत्तर, पश्चिम, मध्य आणि दक्षिण आशियामध्ये असंख्य कुटुंबीय हा आनंदोत्सव जल्लोषात साजरा करतात.

Google Doodle: nowruz 2024 काय आहे?

नवरोज (nowruz 2024) हा इराणी नवीन वर्षाचा सण आहे. जो, की वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या मुहूर्तावर आणि पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विशेष म्हणजे इराणमध्ये जुन्या काळात हा सण पर्शिया नावाने देखील साजरा केला जात होता.

Google Doodle: nowruz 2024 सण कसा साजरा करतात?

हा इराणी किंवा पर्शियन सण साजरा करण्यासाठी सर्वप्रथम इराणी आणि पर्शियन लोक आपली घरे स्वच्छ करतात. या काळात त्यांनी इतर लोकांकडून ज्या काही वस्तू किंवा पैसे उधारीने घेतले असतात, ते देखील ते परत करतात. यासोबतच आपल्या शत्रूशी किंवा विरोधकांसोबतही ते मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करतात. इराणींचा हा सण निसर्गावरील प्रेमाचे प्रतीक आहे. या सणानिमित्त लोक आपल्या घरी वेगवेगळ्या प्रकारचे गोड पदार्थ बनवतात. तसेच आपल्या आयुष्यात नवीन वर्षाचा सन्मान करण्यासाठी अंडी सजवणे, नवीन सुरुवात करण्यासाठी आपले घर स्वच्छ करणे तसेच वसंत ऋतूतील वेगवेगळ्या भाज्या आणि औषधी वनस्पतींचा अवलंब करून त्यांचा आनंद घेणे आदी गोष्टी ते करत असतात.

असे मानले जाते की नवरोजच्या दिवशी घरातील सर्व प्रकारचे आजार आणि वाईट परिस्थिती नाहीशी होते. या सोबतच संध्याकाळी घरातील सर्व भांडी दूध, दही, मिठाई आदींसह पाण्याने भरली जातात. येणाऱ्या वर्षात कोणत्याही प्रकारच्या धान्याची कमतरता भासू नये हा यामागील उद्देश असतो. त्यामुळेच इराणमधील लोकांना पारशी म्हटले जाऊ लागले. नववर्ष आगमनाच्या निमित्ताने साजरा केला जाणारा हा सण पर्शियन संस्कृतीशी संबंधित आहे. जी सुमारे 3000 वर्ष जुनी मानली जाते. जगातील सर्वच इराणी आणि पर्शियन लोक हा नवीन वर्षाचा उत्सव दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा करतात.

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे पण नक्की बघा :