Hardik Pandya and Mark Boucher: आयपीएल (IPL) सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्स ने पत्रकार परिषद घेतली होती. ज्यामध्ये मुंबई इंडियन्सचा नवीन कर्णधार हार्दिक पांड्या आणि प्रशिक्षक मार्क बाउचर उपस्थित होते.
समाचार इन: Hardik Pandya and Mark Boucher: हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधार पद भूषवताना दिसणार आहे. दरम्यान आयपीएल सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सची पत्रकार परिषद पार पडली आहे. यात नवीन कर्णधार हार्दिक पांड्या आणि प्रशिक्षक मार्क बाउचर उपस्थित होते. दोघांनी मिळून पत्रकारांच्या प्रश्नांना चोख उत्तरे दिली.
या पत्रकार परिषदेदरम्यान असे दोन प्रश्नही समोर आले, ज्याने हार्दिक आणि प्रशिक्षक बाउचर यांना धक्काच बसला. पत्रकार परिषदेदरम्यान हार्दिकला पत्रकाराने एक साधा प्रश्न विचारला, ज्यावर मुंबई इंडियन्सचा कर्णधार गप्प राहिला. एका पत्रकाराने हार्दिकला प्रश्न विचारला की, “तुम्ही कर्णधार असाल तरच मुंबई इंडियन्स मध्ये सामील व्हाल अशी अट घातली होती का?” हा प्रश्न विचारल्यावर हार्दिक गप्प राहिला आणि त्याने कोणतेही उत्तर दिले नाही. त्याचवेळी प्रशिक्षक मार्क बाउचर यांना विचारण्यात आले की, “मार्क, मला हे जाणून घ्यायचे आहे की रोहितच्या जागी हार्दिककडे कर्णधार पद सोपवण्यामागे व्यवस्थापनाचे कारण काय होते?” मार्क यांनी देखील या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत आणि ते या प्रश्नांना घेऊन खूपच अस्वस्थ दिसले.
What is The reason Behind that silence RIP HARDIK PANDYA 🤬 pic.twitter.com/kv9C1vRHg3
— Prof cheems ॐ (@Prof_Cheems) March 18, 2024
रोहितकडून मदत मिळेल (Hardik Pandya on Rohit Sharma)
मात्र, यानंतर हार्दिकने रोहित शर्माबद्दल विधान केले आणि म्हणाला, “यामध्ये पूर्वीपेक्षा वेगळे काहीही होणार नाही. तो नेहमी माझ्या मदतीसाठी तयार असेल. आपल्या सर्वांनाच माहित आहे की रोहित भारतीय टीमचा कप्तान आहे, त्याचा दांडगा अनुभव मला नेहमीच मदत करणारा ठरेल, कारण या संघाने आजपर्यंत जे काही यश प्राप्त केले आहे ते त्याच्या कप्तानी मध्येच केले आहे. मला फक्त ही विजयाची शृंखला पुढे घेऊन जायची आहे.” हार्दिक म्हणाला, “मला नाही वाटत की ही माझ्यासाठी काही वेगळी परिस्थिती आहे, हा एक चांगला अनुभव असेल कारण आम्ही दहा वर्षापासून सोबत खेळत आहोत. मी माझं पूर्ण करिअर रोहितच्या नेतृत्वात खेळलो आहे. मला पूर्ण विश्वास आहे की रोहित मला समर्थन आणि मार्गदर्शन नेहमीच करत राहील.” तसेच हार्दिक पांड्याने हे देखील मान्य केले की, गुजरात टायटन्सची साथ सोडणे आणि मुंबई इंडियन्स मध्ये रोहितच्या जागी कप्तान होणे, यावर टीकाकारांच्या एका वर्गाने अत्यंत तिखट प्रतिक्रिया दिल्या होत्या.