इकडे बॉलीवूड चित्रपटांचे फॅन्स दुष्काळ झेलतच होते, तेवढ्यात दुसरीकडे एका विश्लेषकाने सोशल मीडियावर पोस्ट केल्याने वातावरण अधिक चिघळले आहे. या पोस्टमधून शक्यता वर्तवण्यात आली की, साऊथचे मोठे कलाकार आता बॉक्स ऑफिसवर बॉलीवूडच्या चित्रपटांना मागे टाकतील का? चला तर मग जाणून घेऊया, खरोखर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का!
समाचार इन: मागील काही हप्त्यांपासून बॉलीवूडच्या चाहत्यांची नाराजी उघडपणे दिसून येत आहे. मार्च अखेरीस आलेल्या ‘क्रू’ चित्रपटानंतर असा कोणता मोठा चित्रपट आलेला नाही, की तो पाहण्यासाठी चाहते घरातून बाहेर पडत थिएटरमध्ये जातील. तब्बू करीना कपूर आणि कृति सेनन यांच्या ‘क्रू’ या चित्रपटाने एप्रिलच्या सुरुवातीला भरपूर मनोरंजन केले. मात्र त्यानंतर या तप्त उन्हात चाहत्यांना बॉलीवूड मार्फत कोणताही असा चित्रपट मिळाला नाही, ज्याने चाहत्यांचे मनोरंजन होऊ शकेल.
या वीकेंडमध्ये अजय देवगनच्या ‘मैदान’ सह अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या ‘बडे मिया छोटे मिया’ च्या माध्यमातून वातावरण निर्मिती होण्याची शक्यता होती. परंतु हे दोन्ही चित्रपट खूपच कासव गतीने चालले असून दोन हप्त्यांमध्ये बॉक्स ऑफिसवर तोंडघशी पडले.
इकडे बॉलीवूड चित्रपटांचे फॅन्स दुष्काळ झेलतच होते, तेवढ्यात दुसरीकडे एका विश्लेषकाने सोशल मीडियावर पोस्ट केल्याने वातावरण अधिक चिघळले आहे. या पोस्टमधून शक्यता वर्तवण्यात आली की, साऊथचे मोठे कलाकार आता बॉक्स ऑफिसवर बॉलीवूडच्या चित्रपटांना मागे टाकतील का? यामध्ये जुनियर एनटीआर, प्रभास, अल्लू अर्जुन, रामचरण, कमल हसन आणि सूर्या सारख्या बड्या कलाकारांचे नाव घेण्यात आले आहे. तर्क लावण्यात आला आहे की, या सर्वांच्या येणाऱ्या पॅन इंडिया चित्रपटांना उत्तर भारतात मोठी रिलीज मिळेल.
विशेष म्हणजे हे हिंदी भाषेतही प्रदर्शित होणारे साऊथचे चित्रपट मार्केटमध्ये पडलेला दुष्काळ दूर करण्यासाठीचा दमखम नक्कीच ठेवतात. ज्या साऊथच्या कलाकारांचे नाव घेण्यात आले आहे, ते नक्कीच बॉक्स ऑफिसवर आपली पॉवर जमवून आहेत आणि त्यांचे चित्रपट जर दमदार निघाले तर हिंदी ऑडियन्स नक्कीच त्यांना भरमसाठ कमाई करून देईल. परंतु येथे प्रश्न हा आहे की, 2023 मध्ये इंडियन सिनेमावर कमाईची उधळण करणारे बॉलीवूड 2024 च्या सुरुवातीच्या चार महिन्यातच या अवस्थेत पोहोचले आहे की, त्याला ‘रेस्क्यू’ ची गरज भासत आहे?
काय म्हणतंय, बॉलीवूडचे रिपोर्ट कार्ड..
एप्रिल महिन्यात बॉलीवूडचा एकही चित्रपट काही खास कमाल करू शकला नाही. परंतु मार्चपर्यंत बघितले तर, वर्षाच्या पहिल्या तिमाहीत इंडस्ट्रीचा सक्सेस रेट हा खरंतर मागील वर्षापेक्षा चांगला होता. 2023 च्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये बॉलीवूडचे तीन चित्रपट पूर्णपणे हिट ठरले होते. ते म्हणजे, पठाण, मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे आणि तू झूठी मैं मक्कार. तर अजय देवगनचा ‘भोला’ फ्लॉपच्या टॅग पासून बचावला होता. परंतु या चित्रपटाला आपण हिट देखील म्हणू शकत नाही. या चित्रपटाने बॉलीवूडला वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर 1400 कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा बिजनेस दिला होता.
यावर्षी पहिल्या ती माहित बॉलिवूडला चार इट्स चित्रपट मिळाले आहेत ते म्हणजे शैतान कृ तेरी बातो मे ऐसा उलझा जिया आणि आर्टिकल 370 ऋतिक रोशन चा फायटर जरी हिट होण्यापासून खोकला असेल तरी त्याला आपण प्लॉट म्हणू शकत नाही या पाच चित्रपटाने बॉलीवूडला वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफिस वरून 950 कोटी पेक्षा जास्त कलेक्शन करून दिले आहे मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी बॉलीवूड मधून मध्ये केवळ एकच कमतरता राहिली ती म्हणजे पहिल्या तीन महिन्यात पठाण सारखा 500 कोटी रुपये 500 किंवा 1000 कोटी रुपये कमवून देणारा कोणताही चित्रपट प्रदर्शित झाला नाही अन्यथा यशाच्या बाबतीत बॉलीवूडचे गणित सर्वात चांगले राहिले असते.
साऊथच्या चित्रपटांची काय आहे परिस्थिती?
ज्या सोशल मीडियाच्या पोस्टवरून बॉलिवूड वर्सेस साऊथचा मुद्दा पुन्हा एकदा बाहेर आला आहे, त्यामध्ये ज्या साऊथच्या कलाकारांचे नाव घेण्यात आले, त्यामध्ये जूनियर एनटीआर, प्रभास, अल्लू अर्जुन आणि रामचरण हे तेलुगु इंडस्ट्रीमधून येतात, तर कमल हसन आणि सूर्या हे तमिळ इंडस्ट्रीतून येतात.
तेलुगु इंडस्ट्रीकडे बघितले तर पहिल्या तीन महिन्यात तेथून फक्त तीन हिट्स आले आहेत. ते म्हणजे, ‘हनुमान’, ‘गुंटूर कारम’ आणि ‘टिल्लू स्क्वायर’ या चित्रपटांचे टोटल वर्ल्ड वाइड कलेक्शन 650 कोटींपेक्षा थोडे अधिक आहे, तर तमिळ इंडस्ट्रीतून दोन हिट चित्रपट मिळाले आहेत. ते म्हणजे ‘कॅप्टन मिलर’ आणि ‘अयलान’, या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर 200 कोटींपेक्षा जास्त कलेक्शन केले आहे. तथापि कन्नड इंडस्ट्रीमधून यावर्षी 100 कोटी कमावणाऱ्या चित्रपटाची वाट अजून तरी पहावी लागत आहे.
साऊथमध्ये मल्याळम इंडस्ट्रीची कमाल
या सर्वांच्या तुलनेत मल्याळम फिल्म इंडस्ट्रीने यावर्षी कमाल केली आहे. ही अशी इंडस्ट्री आहे, जीचा सक्सेस रेट यावर्षी बॉलीवूड पेक्षा अधिक आहे. परंतु बॉक्स ऑफिसच्या तुलनेत मल्याळम सिनेमाला हिंदीला टक्कर देणे सध्या तरी कठीण दिसत आहे. मल्याळम इंडस्ट्रीला यावर्षी पाच मोठे हिट्स चित्रपट मिळाले आहेत. यामध्ये ‘मंजूमेल बॉईज’, ‘आदुजीवितम’, ‘प्रेमलु’, ‘आवेशम’ आणि ‘ब्रह्मयुगम’ यांचा समावेश आहे. या चित्रपटांमधून इंडस्ट्रीला वर्ल्डवाइड 700 कोटी रुपयांचे कलेक्शन मिळाले आहे.
बॉक्स ऑफिसवर मल्याळम फिल्म इंडस्ट्रीला तेलुगु आणि तमिळ चित्रपटांच्या तुलनेत खूप छोटे मानले जाते. त्यानुसार विचार केला तर हे वर्ष मल्याळम सिनेमासाठी अतिशय अद्भुत ठरत आहे. आता पुन्हा त्याच पोस्टवर जाऊया जेथून हा मुद्दा सुरू झाला. ज्या कलाकारांकडून हिंदी फिल्म इंडस्ट्रीचे सुगीचे दिवस येतील ही अपेक्षा केली जात आहे, त्यांचे चित्रपट चालले तर ते तेलुगु आणि तमिळ स्टार आपल्याच इंडस्ट्रीचे भले करतील. हिंदी इंडस्ट्रीमध्ये त्यांचे यश हे एक अतिरिक्त फायद्याचेच ठरेल यात काही दुमत नाही.
बॉलीवूड अजूनही अशी एकमेव इंडियन फिल्म इंडस्ट्री आहे, जिने यावर्षी 1000 कोटी पेक्षा जास्त वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहिले आहे. एप्रिल संपत आला असून मे महिन्यात देखील जास्त मोठे चित्रपट पाहायला मिळणार नाहीयेत. परंतु मे च्या अखेरीस येत असणारा वरून धवनचा ‘बेबी जॉन’ हा चित्रपट कमाल करू शकतो. त्यानंतर कार्तिक आर्यनचा ‘चंदू चॅम्पियन’, अक्षय कुमारचा ‘सरफिरा’, अजय देवगनचा ‘सिंघम अगेन’ आणि राजकुमार रावचा ‘स्त्री-2’ सारखे चित्रपट येणार आहेत.
बॉलीवूडकडे असे अनेक चित्रपट आहेत, जे 200-300 कोटी पर्यंत सहज कमाई करू शकतात. सलमान, शाहरुख आणि आमिर खानची तिकडी यंदा रेसमध्ये नसल्याने हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल की कोणता हिंदी चित्रपट यावर्षी 1000 कोटींच्या घरात जाऊन सर्वत्र चर्चेचा विषय ठरेल.