समाचार इन: MS Dhoni New Role In IPL: देशातील सर्वांचा आवडता क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्स ला त्याच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2023 चे विजेतेपद मिळवून दिले होते. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने एकूण पाच वेळा आईपीएलमध्ये बाजी मारली आहे. आता पुन्हा एकदा दोन्ही कर्णधार म्हणून चेन्नईसाठी काहीतरी करेल अशी अशा चाहत्यांना लागली आहे. पण त्याआधी धोनीने त्याच्या नव्या कॅरेक्टरची घोषणा केली आहे, जी चाहत्यांसाठी एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नाही.
धोनी कर्णधार म्हणून आयपीएल 2024 खेळणार नाही का?
धोनीने सांगितलेले हे सरप्राईज नेमके काय असेल हे अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही. धोनीने फेसबुकच्या माध्यमातून एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये लिहिले की, “नवीन सीजन आणि नवीन कॅरेक्टरची आता अधिक वाट मी पाहू शकत नाही, सोबत रहा.”
मात्र या पोस्टमध्ये धोनीने कोणताही खुलासा केलेला नाही की तो नवीन हंगामासाठी कोणत्या कॅरेक्टर बद्दल बोलत आहे. त्यामुळे आता धोनी चाहत्यांसाठी काय नवीन घेऊन येणार आहे हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्याच्या या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये निश्चितच सस्पेन्स वाढला आहे हे मात्र नक्की.
धोनीच्या नेतृत्वात चेन्नई पाच वेळा चॅम्पियन
चेन्नई सुपर किंगसाठी धोनीचे कर्णधारपद खूप यशस्वी ठरले आहे. माहीच्या नेतृत्वाखाली संघाने आतापर्यंत पाच विजेतेपद जिंकली आहेत. गेल्या हंगामात आयपीएल विजेतेपद जिंकल्यानंतर धोनीने मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माची बरोबरी केली आहे, ज्याने त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला पाच विजेतेपद मिळवून दिले आहेत. 2023 च्या एप्रिल मध्ये रोहित ने मुंबईची कमान हाती घेतली होती, परंतु 2024 च्या हंगामासाठी हार्दिक पांड्याने त्याच्या जागी कर्णधार पद मिळविण्याची माजी मारली आहे.
धोनी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार
विशेष बाब म्हणजे दोन्ही भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार देखील राहिला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली त्याने टीम इंडियाला 2007 विश्वचषक, 2011 एक दिवसीय विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन ट्रॉफी अशा तीन आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. भारताला तीन आयसीसी विजेतेपद मिळवून देणारा धोनी हा आतापर्यंतचा एकमेव कर्णधार आहे.