समाचार इन: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे सर्वात लहान चिरंजीव अनंत अंबानी आणि व्यावसायिक वीरेन मर्चंड यांची मुलगी राधिका यांचा प्री-वेडिंगचा समारंभ गुजरातच्या जामनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. येथे देशातील आणि देशाबाहेरील अनेक प्रसिद्ध व्यक्ती आणि सेलिब्रिटी पाहायला मिळत आहेत. या कार्यक्रमात अमीर खान, शाहरुख खान, सलमान खान, अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर, अर्जुन कपूर यांसारखे अनेक बॉलिवूडचे कलाकार जामनगर येथे पोहोचले आहेत. यामध्ये बॉलीवूडचे सर्वात हॉट बी-टाऊन जोडपे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण तसेच विकी कौशल आणि कतरीना कैफ देखील सहभागी झाले.
दीपिका-रणवीर ने वेधले सर्वांचेच लक्ष
या प्री-वेडिंग कार्यक्रमात रणवीर-दीपिकाने गरबावर ठेका धरला असून त्यांचा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. दीपिकाने पहिल्यांदा तर म्युझिक इव्हनिंग साठी गोल्डन आणि ब्लॅक रंगाच्या लेहेंगा चोलीमध्ये स्टेजवर परफॉर्म केला आणि त्यानंतर गरबासाठी अनारकली ड्रेस परिधान करत सर्वांचेच लक्ष वेधले. या कार्यक्रमासाठी रणवीरने काळ्या आणि निळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. तसेच दुसऱ्या एका गाण्यावर दीपिका आणि रणवीर ‘दिल धडकने दो’ पासून ‘गल्ला गुडिया’ गाण्यावर थिरकताना दिसले.
गरोदर असल्याकारणाने एका जागीच नाचताना दिसली ‘दीपिका’
या सर्व कार्यक्रमादरम्यान जरी दीपिकाने नृत्य करून उपस्थितांची मने जिंकली असतील तरी यादरम्यान दीपिका फारशा वेगाने थिरकताना दिसली नाही. कारण दीपिका गरोदर असून सेकंड ट्रिमिस्टर मध्ये आहे. त्यामुळे ती एका ठिकाणीच रणवीरची साथ देत हळू हळू नाचत होती. परंतु रणवीरने नेहमीप्रमाणेच आपल्या वेगळ्या अंदाजात एनर्जेटिक डान्स करून दीपिकाची भरपाई भरून काढली. त्यांच्य्या या पोस्टवर चाहत्यांनी लिहिले की, त्यांना पाहून रामलीला मधील गाण्यांची आठवण झाली.
यासोबतच किंग खानचा देखील एक व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसत आहे. शाहरुख खान ब्लॅक ऑऊटफिटमध्ये दिसत होता. यासोबतच बॉलिवूड व्यतिरिक्त साऊथ स्टार रामचरण देखील उपासना सोबत या कार्यक्रमात दिसला. रामचरणने देखील यावेळी कार्यक्रमाची रंगत वाढवत आपल्या ऑस्कर विनींग चित्रपट ‘आरआरआर’ चे लोकप्रिय गाणे ‘नाटू नाटू’ वर परफॉर्म केला. यावेळी त्याची साथ देण्यासाठी हिंदी सिनेमाचे तिन्ही खान देखील दिसले.