‘पंजाबराव डख’ यांनी वर्तवला मान्सूनचा अंदाज, जाणून घ्या राज्यात ‘कधी’ होणार ‘पाऊस’

पंजाबराव डख यांनी यावर्षी अंदमानात 22 मे ला मान्सूनचे आगमन होणार असल्याचे सांगितले असून महाराष्ट्रात हे आगमन 12 ते 13 जूनच्या आसपास होईल आणि मौसमी पावसाला सुरुवात होईल असा अंदाज वर्तवला आहे.

समाचार इन: मे महिना सुरू झाला की सर्वांना आतुरता लागते ती जून महिन्यात येणाऱ्या मान्सूनची. पावसाळा म्हटला की एक आनंदाची लहर मनात उठते आणि नकळतपणे आपण हिरव्यागार वातावरणात बागडू लागतो. झाडांवरून, वेलींवरून पडणारे ते पावसाचे गार थेंब आपल्या अंगावर पडत असल्याचा सुखद क्षण मनाला शहारून जातो. त्यामुळे पावसाळा हा सर्वांच्याच आवडीचा विषय आहे.

आपल्या सर्वांचा आवडता हा मान्सून नेमका कोणत्या तारखेला महाराष्ट्रात येऊन ठेपणार आहे, यांची माहिती जाणून घ्यायची असेल तर पूर्ण लेख वाचा आपल्या सर्व प्रश्नांची उत्तर आपणास इथे मिळतील.

https://www.amazon.in?&linkCode=ll2&tag=sachinchava03-21&linkId=e85d4d0032dd71ef843313237d36c591&language=en_IN&ref_=as_li_ss_tl

पावसाचा अगदी चोख अंदाज वर्तवणारे हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी मान्सून राज्यात कधी दाखल होईल याबाबत अंदाज व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले आहे की, येणाऱ्या 22 तारखेला मान्सूनचं आगमन आपल्या देशात होणार असून महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन हे 12 ते 13 जूनला होईल.

पंजाबराव डख यांनी सांगितले की, ज्यावर्षी उन्हाळ्यात जास्त पाऊस झाला आहे, त्यावर्षी पावसाळा हा साधारण असल्याचे दिसून आले आहे. त्या तुलनेने यंदा उन्हाळ्यात फारसा पाऊस पडल्याचे चित्र कुठेही दिसून आलेले नाही. त्यामुळे यंदा पावसाळा हा जोरात असणार आहे. गेल्या वर्षी 2023 मध्ये उन्हाळ्यात अधिकचा पाऊस झाल्याने पावसाळ्यात मात्र पावसाने दांडी मारल्याचे चित्र आपल्याला दिसून आले.

पंजाबराव डख यांनी यावर्षी अंदमानात 22 मे ला मान्सूनचे आगमन होणार असल्याचे सांगितले असून महाराष्ट्रात हे आगमन 12 ते 13 जूनच्या आसपास होईल आणि मौसमी पावसाला सुरुवात होईल असा अंदाज वर्तवला आहे.

विशेष म्हणजे पावसाची वाट आपण ज्या कारणासाठी प्रामुख्याने बघत असतो, ते म्हणजे पेरणी. त्यामुळे डखांनी शेतकऱ्यांना पडणाऱ्या या प्रश्नाचे देखील निरसन केले असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात पेरणीसाठी योग्य असणाऱ्या पावसाला 22 जून नंतर सुरुवात होणार असल्याचे सांगितले आहे.

राज्यात पेरणीयोग्य पाऊस 25 ते 27 जून दरम्यान होईल आणि आणि जूनच्या अखेरीस राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या पेरण्या होऊ शकतात असा विश्वास त्यांनी वर्तवला आहे.

https://amzn.to/4bpvVSs

यासोबतच त्यांनी जुलै महिन्यात जास्तीचा पाऊस पडेल तर ऑगस्ट महिन्यात साधारण आणि सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचे भाकीत पंजाबराव डख यांनी केले आहे.

दरम्यान सध्या राज्यभरात पूर्व मौसमी पावसाला पोषक असे वातावरण निर्माण होत असून 7 मे ते 11 मे 2024 पर्यंत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपात पूर्व मौसमी पाऊस हजेरी लावणार असल्याचे चिन्ह आहेत अशी माहिती देखील पंजाबराव डख यांनी दिली आहे.

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे पण नक्की बघा :