धक्का की अपघात? ममता बॅनर्जी यांच्या कपाळावर कशी झाली जखम, भाऊ-वहिनीने सांगितलं ‘असं’ काही, जाणून घ्या..

CM Mamata Banerjee

समाचार इन: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या कपाळावर आणि नाकावर गुरुवारी इजा झाली. घटनेच्या वेळी मुख्यमंत्री आपल्या कालीघाट या निवासस्थानी होत्या. दुखापत झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी एसएसकेएम हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्या कपाळावर आणि नाकावर तीन टाके टाकले. ममता बॅनर्जी यांच्या दुखापतीची माहिती पक्षाने सोशल मीडिया अकाउंटद्वारे दिली असून पक्षातर्फे टाकण्यात आलेल्या पोस्टमध्ये ममता बॅनर्जी यांच्या कपाळापासून ते तोंडापर्यंत रक्ताची धार लागलेली दिसत होती. दरम्यान उपचार घेतल्यानंतर ममता या सुखरूप घरी पोहोचल्या आहेत.

याच दरम्यान आता ममता बॅनर्जी यांना इजा कशी झाली यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबतीत वेगवेगळे वक्तव्य समोर आल्याने अनेक प्रश्न उठताना दिसत आहेत. असा दावा करण्यात येत आहे की, ममता बॅनर्जी या त्यांच्या बेडरूममध्ये बेडवरून कोसळल्या तर त्यांच्या वहिनींचे म्हणणे आहे की हा रचलेला कट असू शकतो. तसेच रुग्णालयातील संचालकांनी सांगितले की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मागून कुणीतरी धक्का दिल्याने या जखमा झाल्या आहेत. यासोबतच ममता बॅनर्जी यांच्या भाऊने देखील या विषयावर विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, ते घटनास्थळी उपस्थित नव्हते, परंतु त्यांच्या पत्नीने त्यांना सांगितले की कशाप्रकारे ममता बॅनर्जी या जखमी झाल्या. सायंकाळी सुमारे 7:30 वाजता बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना रुग्णालयाच्या वुडबर्न वार्डमध्ये भरती करण्यात आले. त्यांच्या कपाळावर झालेल्या जखमेवर तीन टाके घालून उपचार करण्यात आला. तथापि, त्यांच्या नाकावर किरकोळ झालेल्या जखमेमुळे एक टाका टाकण्यात आला. सिटीस्कॅन आणि एमआरआय सहित विविध प्रक्रिया आटोपल्यानंतर त्यांना रात्री 9:45 वाजता घरी सोडण्यात आले.

संचालकांच्या वक्तव्यावरून उपस्थित झाले अनेक प्रश्न

आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, आम्हाला हे जाणून घ्यायचे होते की, त्यांचे खाली कोसळणे हा एक अपघात होता की मग त्या रक्तदाबाच्या चढउतारामुळे खाली कोसळल्या. सुमारे अकरा वाजेपर्यंत ममता बॅनर्जी यांच्या कोसळण्याच्या बाबतीतील गोष्टी या बदलत गेल्या, कारण एसएसकेएम चे संचालक मनिमॉय बंदोपाध्याय यांनी या घटनेला संभाव्य बाह्य शक्ती जबाबदार असल्याचा इशारा दिला. बंदोपाध्याय यांनी सांगितले की, अज्ञात धक्काबुक्कीमुळे त्यांना दुखापत झाली आहे. मात्र, त्यांनी विशिष्ट कारणाबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला.

संचालक म्हणाले, इसीजी आणि सिटी स्कॅन सारख्या तपासण्या करण्यात आल्या. त्यांना रुग्णालयात डॉक्टरांच्या निगरानीत राहण्याचा सल्ला देण्यात आला होता, परंतु त्यांनी घरी परतणे पसंत केले. आम्ही त्यांच्यावर बारीक नजर ठेऊन आहोत. शुक्रवारी त्यांची पुन्हा तपासणी केली जाईल.

ममता बॅनर्जी यांच्या वहिनी म्हणाल्या, कट रचल्याची शंका

ममता बॅनर्जी यांच्या वहिनी आणि तृणमूलच्या नगरसेवक कजरी बॅनर्जी यांनी या प्रकरणात कट असल्याचा संशय व्यक्त केला आहे. कुणाच्या तरी धक्क्याने दीदी पडल्याचे त्यांनी सांगितले. बंगाली भाषेत त्यांनी जो उच्चार केला त्याचा अर्थ त्यांना कोणत्यातरी वस्तूचा धक्का बसला. तसेच कजरी यांचे पती कार्तिक बॅनर्जी म्हणाले, ‘मी तिथे उपस्थित नव्हतो, पण मी माझ्या पत्नीशी बोललो, जी दीदी सोबत एसएसकेएम रुग्णालयात गेली होती.’ कुटुंबातील आणखी एका सदस्याने सांगितले की, ममता प्रथम कोसळल्या आणि तिथे असलेल्या एका छोट्या कॅबिनेटच्या धारदार पातेने जखमी झाल्या.

ममता बॅनर्जी यांचे भाऊ कार्तिक बॅनर्जी यांनी सांगितले की, त्या आपल्या बेडरूम मध्ये अचानक कोसळल्या आणि त्यांच्या डोक्याला इजा झाली. हे कसे झाले हे अद्यापही मला समजले नाही, कारण मी घरी नव्हतो. माझी पत्नी जेव्हा त्यांच्यासोबत रुग्णालयात गेली तेव्हा तिने सांगितले, मलाही नीटपणे सांगता येऊ शकत नाही की हा प्रकार नेमका कसा घडला.

2021 मध्ये मोडला होता पाय

गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिवंगत तृणमलचे नेते सुब्रत मुखर्जी यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यासाठी दक्षिण कलकत्ता येथील गरियाहाट जवळ एका कार्यक्रमाला भेट दिली होती, जो कार्यक्रम त्यांच्या कालीघाट स्थित निवासस्थानापासून जास्तीच्या अंतरावर नव्हता. तेथून त्या घरी पोहोचल्या होत्या. याआधी देखील मार्च 2021 मध्ये बॅनर्जी यांना नंदिग्राम येथे विधानसभा निवडणुकीचा प्रचार करतेवेळी लिगामेंटला दुखापत झाली होती. त्यांनी एका प्लास्टरच्या पायाने व्हीलचेअरवर बसून प्रचार केला होता.

गेल्या जून महिन्यात उत्तर बंगालमधील सेवोक एअरबेसवर आपत्कालीन हेलिकॉप्टर उतरवताना ममता बॅनर्जी यांच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्या दुखापतीसाठी त्या मागच्या वेळी सप्टेंबर 2023 मध्ये रुग्णालयात गेल्या होत्या. त्यानंतर काल पुन्हा एकदा दुखापतीमुळे त्यांना रुग्णालयाची पायरी चढावी लागली.

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे पण नक्की बघा :