सुपरस्टार ‘रजनीकांत’ दिग्गज कलाकारांसह पुन्हा एकदा खाकी वर्दीत; ‘या’ चित्रपटातून तोडणार ‘रेकॉर्डस्..’

या चित्रपटात रजनीकांतसह झळकणार अनेक ‘दिग्गज’ कलाकार..

समाचार इन: सुपरस्टार रजनीकांत (Rajnikant) नुकताच मुलगी ऐश्वर्याच्या ‘लाल सलाम’मध्ये दिसला होता पण हा चित्रपट फारसा काही कमाल करू शकला नाही. लोकांना या चित्रपटाकडून ज्या अपेक्षा होत्या त्या काही अंशी खऱ्या ठरल्या नाहीत. परंतु, सध्या रजनीकांत त्याच्या पुढच्या चित्रपटाच्या तयारीत आता व्यस्त झाला आहत. 73 वर्षीय अभिनेता सध्या दिग्दर्शक टीजे गन्नावेलच्या आगामी ‘वेट्टाइयां’ (Vettaiyan) या चित्रपटासाठी शूटिंग करत आहे.

27 फेब्रुवारी रोजी थलैवर चित्रपटाच्या पुढील टप्प्याच्या शूटिंगसाठी हैदराबादला गेला आहे. या दरम्यान, ‘वेट्टाइयां’ चित्रपटाच्या सेटवरून रजनीकांतची एक नवीन झलक समोर आली असून त्यात तो पोलिसांच्या वर्दीत दिसत आहे. होय, रजनीकांत पुन्हा एकदा पोलिसाच्या वर्दीत पडद्यावर झळकणार आहे. अभिनेत्याचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो खाकी वर्दी परिधान केलेला दिसत आहे.

व्हिडिओमध्ये त्याच्या कारला चाहत्यांनी चहूबाजूंनी घेरले आहे आणि रजनीकांत त्याच्या कारमधून बाहेर येताच चाहते त्याचा जयजयकार करू लागले. रजनीकांत आपल्या ड्रायव्हरसोबत हैदराबादमध्ये चित्रपटाच्या शूटिंगच्या ठिकाणी गेला होता. व्हिडिओनुसार, तो या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार असून, प्रेक्षकांनी त्याला या भूमिकेत आधीच भरभरून प्रेम ही दिले आहे.

रजनीकांतने जेलर साहेबच्या भूमिकेत जिंकली आहेत लाखो चाहत्यांची मने

उल्लेखनीय बाब म्हणजे, गेल्या वर्षी रजनीकांतने जेलरमधून आपल्या अभिनयाने धमाल उडवली होती. त्यातही रजनीकांत जेलर साहेबांच्या भूमिकेत दिसला आणि त्याच्या व्यक्तिरेखेचे ​​लोकांनी खूपच कौतुक केले. जेलरसाठी 200 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 650 कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला होता. चित्रपटगृहांनंतर ओटीटी OTT वरही हा चित्रपट खूप पाहिला जात आहे. आता तो पुन्हा एकदा ‘वेट्टाइयां’ पोलीस ऑफिसरच्या भूमिकेसाठी सज्ज होत आहे.

‘वेट्टाइयां’ चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित

मिळालेल्या माहितीनुसार, रजनीकांतचा आगामी चित्रपट ‘वेट्टाइयां’ हा एका सत्यकथेवर आधारित जबरदस्त ॲक्शन एंटरटेनर आहे. या चित्रपटात अभिनेता मुस्लिम पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वीच्या एका चर्चेदरम्यान रजनीकांतने होते की, ज्ञानवेलचा ‘वेट्टाइयां’ मार्च अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. यानंतर तो ब्रेक घेईल आणि दिग्दर्शक लोकेश कनगराजच्या ‘थलैवर 171’ कडे वळेल.

‘वेट्टाइयां’ मध्ये अमिताभ बच्चनही महत्त्वाच्या भूमिकेत

‘वेट्टाइयां’ मध्ये अमिताभ बच्चन, राणा दग्गुबती, फहद फासिल, मंजू वॉरियर, रितिका सिंग आणि दुशारा विजयन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. लायका प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाला अनिरुद्ध रविचंदरने संगीत दिले आहे. असे सांगण्यात येत आहे की वेट्टाइयां केवळ 10 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला जात आहे परंतु त्याच्या बजेटबाबतची माहिती अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेली नाही.

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे पण नक्की बघा :