स्वाती मालीवाल यांनी एफआयआर मध्ये म्हटले आहे की, त्या सतत मदतीसाठी ओरडत होत्या पण बिभव थांबला नाही. बिभवने त्यांच्या छातीवर, पोटावर आणि शरीराच्या खालच्या भागावर लाथा मारल्याचा आरोप आहे.
समाचार इन: आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालीवाल यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानी मुख्यमंत्र्यांचे सहकारी बिभव कुमार यांनी मारहाण आणि गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी स्वाती मालीवाल यांचे दंडाधिकाऱ्यांसमोर लेखी जबाब नोंदवले. स्वाती मालीवाल यांनी एफआयआर मध्ये बिभव कुमार यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
स्वाती मालीवाल यांनी दाखल केलेल्या एफआयआर मध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी बिभव कुमार यांनी स्वाती मालीवाल यांना अनेक वेळा लाथ मारली आणि सुमारे सात-आठ चापटी मारल्याचे म्हटले आहे. स्वाती यांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला तेव्हाही बिभव थांबला नाही. स्वाती यांनी सांगितले की, त्या सतत मदतीसाठी ओरडत होत्या. पण बिभव थांबला नाही. बिभवने त्यांच्या छातीवर, पोटावर आणि शरीराच्या खालच्या भागावर लाथा मारल्याचा आरोप आहे. स्वातीच्या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी गुरुवारी एफआयआर नोंदवला होता, ज्यामध्ये त्यांनी बिभव कुमारला आरोपी ठरवले होते.
भाजपने या प्रकरणी ‘आप’ला कोंडीत पकडले
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, राज्यसभेच्या एका खासदार महिलेसोबत केजरीवाल यांच्या जवळच्या व्यक्तीने गैरवर्तन केले आहे. असे असूनही दिल्लीचे मुख्यमंत्री अजूनही गप्प आहेत. त्या म्हणाल्या की, केजरीवाल यांनी याबद्दल माफी मागायला हवी होती, मात्र बिभव कुमार त्यांच्यासोबत लखनऊमध्ये फिरत होते.