
OnePlus Watch 2
समाचार इन: वनप्लस (OnePlus) ने मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2024 मध्ये आपले दुसरे जनरेशन घड्याळ लॉन्च केले आहे. मजबूत बॅटरी आणि उत्तम वैशिष्ट्यांसह लॉन्च झालेल्या या घड्याळाची किंमत 24,999 रुपये ठेवली आहे आणि ग्राहक 4 मार्चपासून Amazon, Flipkart, Reliance आणि OnePlus Experience Store वरून खरेदी करू शकतात. OnePlus त्यावर 2000 रुपयांची इन्स्टंट सूट देखील देणार आहे, ज्यासाठी तुम्हाला ICICI बँक वन कार्डद्वारे पैसे अदा करावे लागतील.
वनप्लस वॉच 2 (OnePlus Watch 2) च्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर ते 2.5D सॅफायर क्रिस्टल कव्हरसह येते. पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी या घड्याळाला IP68 रेटिंग मिळते आणि घड्याळाचे वजन हे विना बेल्ट 49g आहे.
वनप्लस वॉच 2 मध्ये 1.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे ज्याचे रिझोल्यूशन 466 x 466 पिक्सेल आहे आणि 600 नीट्स पर्यंत पीक ब्राइटनेस आहे. हे नवीनतम स्मार्टवॉच BES 2700 MCU चिपसेटसह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन W5 SoC वर काम करते.
वनप्लसनुसार, स्नॅपड्रॅगन चिपसेटचा वापर Google ॲप्स हाताळण्यासारख्या पॉवरफुल कामांसाठी केला जातो, तर एफिशियंसी चिपसेट चा वापर बॅकग्राऊंड ॲक्टिव्हिटी आणि सिम्पल टास्कसाठी केला जातो.
वनप्लस वॉच 2 Google च्या WearOS 4 वर कार्य करते आणि यास सिंगल 2 GB RAM आणि 32 GB स्टोरेज पर्यायासह जोडलेले आहे. असे म्हटले जात आहे कि, या घड्याळाची थेट स्पर्धा ॲपल वॉचशी असेल.
वॉच मध्ये मिळते 500mAh बॅटरी
पॉवरसाठी वनप्लस वॉच 2 मध्ये 500mAh बॅटरी आहे, जी 100 तासांची बॅटरी लाइफ प्रदान करते. त्यासाठी ‘स्मार्ट मोड’ वापरावा लागेल. तर वनप्लस वॉच 2 फक्त 60 मिनिटांत पूर्ण चार्ज होऊ शकतो, ज्यासाठी 7.5W VOOC फास्ट चार्जरचा वापर करावा लागेल.