भारतीय क्रिकेटमधील खूप खेळाडू असे आहेत ज्यांचे शिक्षण हे त्यांच्या खेळाप्रमाणेच अव्वल दर्जाचे आहे. त्यामधील एका महाराष्ट्रीयन खेळाडूबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.
समाचार इन: भारतीय खेळाडूंनी संपूर्ण जगात आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीने भरपूर नाव कमावले आहे. विशेष म्हणजे यात असेही काही खेळाडू आहेत, ज्यांचे शिक्षण त्यांच्या खेळाप्रमाणे अव्वल दर्जाचे आहे. भारतीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त शिक्षण घेतलेल्या खेळाडूंपैकी एक म्हणजे वेगवान गोलंदाज आविष्कार माधव साळवी, या खेळाडूची डिग्री आपल्याला नक्कीच आश्चर्यात टाकेल.
कोण आहेत आविष्कार साळवी
आविष्कार साळवी हे उजव्या हाताचे वेगवान गोलंदाज आहेत. त्यांनी मुंबईसाठी क्रिकेटच्या क्षेत्रात बहुमूल्य योगदान दिले आहे. त्यांनी 2001 मध्ये डेब्यू केला होता. यानंतर दोन वर्षांनी वनडे फॉरमॅटमध्ये डेब्यू केला. 11 एप्रिल 2003 मध्ये ते बांगलादेश विरुद्ध सामना खेळण्यासाठी उतरले. या सामन्यात त्यांनी सात ओव्हरमध्ये केवळ 15 रन देऊन दोन विकेट बळकावल्या होत्या. त्यांची कारकीर्द भलेही चार सामन्यांपुरतीच मर्यादित राहिली, परंतु त्यांनी अजित आगरकर, युवराज सिंह, सौरव गांगुली आणि हरभजन सिंह यांसारख्या बड्या खेळाडूंसोबत सामने खेळले आणि आपले वर्चस्व गाजवले.

आविष्कार साळवी यांनी केलीय पीएचडी
साळवी यांचा जन्म मुंबई मध्ये झाला आणि येथेच त्यांनी शिक्षणही घेतले. साळवी यांनी क्रिकेट मुळे आपल्या शिक्षणाकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. त्यांनी ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट केल्यानंतर पीएचडीची डिग्री देखील प्राप्त केली. त्यांनी एस्ट्रो फिजिक्स मध्ये आपली पीएचडी पूर्ण केली आहे. त्यामुळे त्यांचं नाव आज भारतीय क्रिकेट क्षेत्रात सर्वात जास्त शिकलेल्या खेळाडूंमध्ये गणले जाते.
साळवी यांनी स्वतःला कोच म्हणून सिद्ध केले
जरी साळवे यांनी खेळाडू म्हणून जास्त योगदान दिले नसेल तरीही कोच म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केले असून आज ते क्रिकेट क्षेत्रात मोठे योगदान देत आहेत. सध्या ते ओमानच्या वेगवान गोलंदाजीचे कोच आहेत. ही टीम देखील वर्ल्ड कप टी ट्वेंटी मध्ये भाग घेत आहे. त्यांनी आपल्या कोचिंग करिअरची सुरुवात 2018 मध्ये पुदुच्चेरीच्या घरेलू टीम सोबत केली होती. 2020 मध्ये त्यांना पुन्हा एकदा या संघाचे कोच बनवण्यात आले. 2022 मध्ये ते पंजाब संघाचे कोच बनले आणि या संघासोबत त्यांनी दुसऱ्या सीजनमध्ये स्वतःला सिद्ध करून आपली छाप सोडली. पंजाबने 2024 मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली असून हा 30 वर्षात भारताचा पहिला किताब होता.