Realme C65 ला लाँच करण्यात आले आहे. हा कंपनीचा एक बजेट स्मार्टफोन असून यामध्ये कोणकोणते खास फीचर्स आहेत, त्याबद्दल जाणून घेऊया.
समाचार इन: Realme ने C-Series चा एक नवीन स्मार्टफोन Realme C65 ला व्हिएतनाम मध्ये लाँच केले आहे. हा एक LTE-ओनली हँडसेट असून ज्यामध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आले आहे. या लेटेस्ट C-Series मोबाईल फोनमध्ये 90Hz LCD स्क्रीन आणि 5000mAh बॅटरी सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
Realme C65 च्या 6GB + 128GB व्हेरिएंट ची किंमत VND 36,90,000 (सुमारे 12,350 रु.) इतकी आहे. तर 8GB + 128GB व्हेरिएंट ची किंमत VND 42,90,000 (सुमारे 14,360 रु.) इतकी तर 8GB + 256GB व्हेरिएंट ची किंमत VND 47,90,000 (सुमारे 16,034 रु.) इतकी आहे. ग्राहक या मोबाईल फोनला पर्पल नेबूला आणि ब्लॅक मिल्की वे कलर पर्यायांसह खरेदी करू शकणार आहेत.
Realme C65 च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल जाणून घेऊया
Realme C65 मध्ये 625nits पीक ब्राईटनेस, 90Hz रिफ्रेश रेट आणि HD+ (160×720 पिक्सेल) रिझोल्युशनसह 6.67 इंच LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोन मध्ये 6GB/8GB LPDDR4x रॅम, 128GB/256GB स्टोरेज आणि Mali G52 GPU सह MediaTek Helio G85 प्रोसेसर येते.
हा फोन Android 14 बेस्ड Realme UI 5.0 वर चालत असून फोटोग्राफीसाठी फोनच्या रियल मध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आणि LED फ्लॅश सोबत एक AI लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी साठी फोनच्या फ्रंट साईटला 8MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. याची बॅटरी 5000mAh ची असून या फोनमध्ये 45W SuperVOOC फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे.
सिक्युरिटीसाठी या मोबाईल फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर साईड माऊंटेड आहे. यामध्ये 3.5mm ऑडियो जॅक देण्यात आला आहे. डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंससाठी हा फोन IP54 रेटेड आहे आणि याचे वजन 185 ग्रॅम इतके आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Dual-SIM, 5G, WiFi Bluetooth 5.0, GPS, GLONASS, Galileo आणि BeiDou चा सपोर्ट आहे. याचे डायमेंशन 164.6 x 76.1 x 7.64mm आहे.