WhatsApp ने आपल्या सर्व वापरकर्त्यांसाठी एक नवीन फीचर सुरू केले आहे. यामुळे युजर्सन मेसेज अधिक चांगल्या प्रकारे ऑर्गनाईज करण्यास मदत होईल.
समाचार इन: WhatsApp चे नवीन फीचर चॅट फिल्टरला आता सर्व युजर्ससाठी जारी करण्यात आले आहे. हे वेगवेगळ्या फेजमध्ये युजर्स पर्यंत पोहोचवण्यात येत आहे. येणाऱ्या आठवड्यात या फीचरचा वापर सर्व युजर्स करू शकणार आहेत. मात्र, यासाठी युजर्सकडे व्हॉट्सॲपचे लेटेस्ट व्हर्जन असणे आवश्यक आहे. लेटेस्ट व्हर्जनमध्ये युजर्सला ॲपच्या मुख्य स्क्रीनच्या शीर्षस्थानी तीन नवीन टॅब दिसतील. हे टॅब All, Unread आणि Groups असे असतील. याच्या मदतीने युजर्स अनरीड आणि ग्रूप कन्वर्सेशन्स सहज शोधू शकतील.
WhatsApp चॅट फिल्टर्स नेमके आहे तरी काय?
- All: हे ॲपचे डिफॉल्ट व्ह्यू आहे जिथे सर्व व्हॉट्सॲप चॅट दिसतील. यामध्ये अनरीड आणि ग्रुप मेसेज यांचा समावेश असेल.
- Unread: याच्या मदतीने आपण ते मेसेज शोधू शकणार आहात, जे नजरचुकीने स्क्रोल केले गेले असतील किंवा वाचायचे राहून गेले असतील.
- Groups: याच्या मदतीने तुम्ही सर्व ग्रुप चॅट्स एकाच ठिकाणी शोधू शकाल. तुम्ही येथे समुदायांचे उपसमूह देखील पाहू शकाल.
असे वापरा WhatsApp चॅट फिल्टर्स
- सर्वात आधी गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअर वर जा.
- व्हॉट्सॲपच्या लेटेस्ट व्हर्जनमध्ये अपडेट करा.
- यानंतर मुख्य स्क्रीनवर जा.
- येथे तुम्हाला सर्व चॅट्सच्या वरती तीन नवीन टॅब दिसतील.
- यानंतर अनरीड टॅब किंवा ग्रुप टॅब वर टॅप करून त्या पद्धतीचे चॅट्स आपण पाहू शकाल.
चॅट फिल्टरद्वारे तुम्ही व्हॉट्सॲप कन्वर्सेशन अधिक चांगल्या पद्धतीने ऑर्गनाईज करू शकाल. तसेच अनरीड मेसेज देखील तुम्ही सहजपणे शोधू शकाल.