आजचे पंचांग, 08 March 2024: ‘महाशिवरात्री’ व्रताचा ‘जाणून घ्या’ शुभ मुहूर्त आणि राहुकाळची वेळ..

lord shiva

Today Panchang, Mahashivratri 2024, 8 march 2024: आज महाशिवरात्री व्रत आणि प्रदोष व्रत आहे. तसेच आज रात्री 09 वाजून 58 मिनिटापर्यंत त्रयोदशी तिथी असून त्यानंतर चतुर्दशीच्या तिथीला आरंभ होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया आज पूजेचा शुभ मुहूर्त कधी आणि किती काळ असेल..

समाचार इन: राष्ट्रीय मिती फाल्गुन 18, शक संवत 1945, फाल्गुन कृष्ण, त्रयोदशी, शुक्रवार, विक्रम संवत 2080. सौर फाल्गुन मास प्रविष्टे 25, शब्बान 25, हिजरी 1445 (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख 08 मार्च इ.स. 2024. सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, वसंत ऋतू. राहुकाळ सकाळी 10 वाजून 30 मिनिट ते 12 वाजेपर्यंत.

त्रयोदशी तिथीनंतर रात्री 09 वाजून 58 मिनिटांनी चतुर्दशी तिथी सुरू होते. सकाळी 10:41 वाजता श्रवण नक्षत्रानंतर धनिष्ठा नक्षत्र सुरू होते. मध्यरात्री 12:46 पर्यंत शिवयोग आणि नंतर सिद्धयोग सुरू होईल. गर करण पूर्वाह्न 11 वाजून 39 मिनिटापर्यंत आणि त्यांनतर विष्टी करणचा आरंभ होईल. चंद्र रात्री 09:20 नंतर मकर राशीमधून कुंभ राशीत भ्रमण करेल.

आज चे व्रत: प्रदोष व्रत, महाशिवरात्री व्रत

सूर्योदयाची वेळ: सकाळी 06:38 वाजता
सूर्यास्ताची वेळ: संध्याकाळी 06:25 वाजता

आजचा शुभ मुहूर्त

ब्रह्म मुहूर्त पहाटे 05:01 ते 05:50 पन्नास पर्यंत आहे. विजय मुहूर्त दुपारी 02:30 ते 03:17 पर्यंत असेल. निशिथ काळ मध्यरात्री 12:07 पासून सकाळी 12:56 पर्यंत आहे. गोधुली बेला सायं. 06:23 ते 06:48 पर्यंत आहे. अमृत काळ सकाळी 09:35 ते 11:35 पर्यंत आहे.

आजचा अशुभ मुहूर्त

राहुकाळ सकाळी 10:30 ते दुपारी 12 पर्यंत आहे. गुलिक काळ सकाळी 07:30 ते 09:00 असा असेल. दुर्मुहूर्तचा काळ सकाळी 09:00 ते 09:47 पर्यंत आहे. यानंतर दुपारी 12:56 ते 01:43 वाजेपर्यंत राहील. भद्रकालची वेळ रात्री 09:57 ते 06:37 पर्यंत आहे. पंचक सकाळी 09:20 ते सायं. 06:37 वाजेपर्यंत असेल.

आजचा उपाय: भगवान शिव शंकरांना कच्चे दूध आणि मधाने अभिषेक करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे पण नक्की बघा :