तामिळ चित्रपटातील सुपरस्टार थालापती विजयने नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 (CAA) देशात लागू केल्याबद्दल विरोध दर्शविला आहे. नुकताच आपला एक स्वतःचा पक्ष बनवून राजकारणात उतरणाऱ्या विजयने तामिळ भाषेत एक वक्तव्य जारी केले आहे, ज्यामध्ये त्याने नेत्यांना सांगितले की तामिळनाडूमध्ये हा कायदा लागू होता कामा नये.
समाचार इन: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 लागू केला आहे. हा कायदा लागू केल्यानंतर विरोधी पक्ष मोदी सरकारवर विविध आरोप करत आहेत. याच दरम्यान साऊथचे सुपरस्टार आणि तमिझा वेत्री कडगम (TVK) चे अध्यक्ष थालापती विजयने कायदा लागू करण्याच्या विरोधात वक्तव्य केले आहे.
नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) 2019 साली म्हणजेच चार वर्षांपूर्वी संसदेत पास करण्यात आला होता, परंतु या कायद्यास आत्ता लागू करण्यात आले आहे. या कायद्याच्या मदतीने पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील गैर-हिंदू निर्वासितांना नागरिकत्व मिळू शकणार आहे. मात्र थालापती विजयने केंद्राच्या या कायद्याला लागू करण्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
थालापती विजयने तामिळ भाषेत एक स्टेटमेंट जारी केले असून त्यामध्ये म्हटले आहे की, “एका अशावेळी, जेव्हा देशातील सर्व नागरिक सामाजिक सलोख्याने एकत्र नांदत आहेत, आणि अचानकच नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 (CAA) सारखा एखादा कायदा लागू व्हावा हे मान्य नाही.” आपल्या वक्तव्यात थालापती विजयने तामिळनाडू सरकारला विनंती केली आहे की, त्यांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष घालावे आणि हा कायदा तामिळनाडू राज्यात लागू होऊ देऊ नये.
विशेष म्हणजे आपल्या राजकीय पक्ष स्थापनेच्या घोषणेनंतरचे थालापती विजयचे हे पहिले मोठे वक्तव्य आहे. मागील महिन्यात 2 फेब्रुवारी रोजी विजयने राजकारणात येण्याचे जाहीर केले होते आणि आपला नवीन पक्ष देखील स्थापन केला होता.
थालापती विजयचा असू शकतो हा शेवटचा चित्रपट
थालापती विजयने सक्रिय राजकारणात येण्याची घोषणा आधीच केली आहे. त्याचा आगामी चित्रपट ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम (GOAT) हा आहे, ज्याचे पोस्टर देखील जारी करण्यात आले आहे. राजकारणात जाण्याच्या आधी त्याचा हा शेवटचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, जो की एक पॉलिटिकल सटायर देखील ठरेल. सध्या या चित्रपटाला थालापती 69 म्हणून संबोधले जात आहे. रिपोर्टनुसार या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून दोन नावांची चर्चा सुरू आहे. एक आहे त्रिविक्रम श्रीनिवास, जे की आत्ताच प्रदर्शित झालेल्या महेश बाबूच्या गुंटूर कारम चे दिग्दर्शक आहेत तर दुसरं नाव एच विनोथ यांचे आहे, सध्या हे दोन्ही नाव या चित्रपटाच्या अनुषंगाने खूप चर्चेत आहेत.