IPL 2024 CSK vs RCB: ऋतुराजच्या कप्तानीत सीएसकेने आरसीबीला 6 विकेट्सने केले पराभूत..

IPL 2024 CSK vs RCB
Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Today: आज दि. 22 मार्च रोजी चेन्नईच्या एम. चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना खेळण्यात आला. या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

समाचार इन: आज चेन्नईच्या एम. चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना संपन्न झाला. चेन्नई सुपर किंग्जने यंदाही मागच्या वर्षी प्रमाणेच आपला दबदबा कायम राखत शानदार विजय मिळवला. ऋतुराज गायकवाडच्या कप्तानीत सीएसकेने आरसीबीला 6 विकेट्स ने हरवले आहे.

या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु सुरुवातीला लवकर पडलेल्या विकेट्समुळे आरसीबीला जास्त रन करता आले नाही. अनुज रावत आणि दिनेश कार्तिकने डाव सावरत आरसीबीला चांगल्या स्कोअर पर्यंत नेले खरे, परंतु चेन्नईच्या धडाकेबाज माऱ्यापुढे आरसीबीचा टिकाव लागू शकला नाही.

IPL 2024 CSK vs RCB

कप्तान म्हणून या मॅच मध्ये ऋतुराज ने डेब्यू केला असून तो आपल्या पहिल्या टेस्टमध्ये पास झाला आहे. आरसीबीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत सीएसके समोर 174 धावांचा स्कोर उभा केला, ज्याला चेन्नई सुपर किंग्सने 18.4 ओव्हर मध्ये चार विकेट गमावून पार केले.

आरसीबी कडून 174 धावांचे लक्ष पार करण्यासाठी सीएसके कडून मैदानात प्रथम फलंदाजी करण्यासाठी कप्तान ऋतुराज गायकवाड आणि रचिन रविंद्र उतरले. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 38 रन बनवले. गायकवाड वैयक्तिक 15 धावांवर खेळत असताना यश दयालने कॅमरान ग्रीन कडे झेल देऊन त्याला बाद केले. यानंतर मोठा शॉट मारण्याच्या नादात रचिन रविंद्र देखील 15 चेंडूत 37 रन बनवून पवेलियनमध्ये परतला. रचिनला कर्ण शर्माच्या चेंडूवर रजत पाटीदारने झेल करून माघारी पाठवले. अजिंक्य रहाणे 19 चेंडू 27 रन बनवून आउट झाला. रहाणेने कॅमरन ग्रीनच्या चेंडूवर खेळताना मॅक्सवेलच्या हातात बॉण्ड्री जवळ झेल दिला. डेरिल मिचेलने 22 धावांची पारी खेळली. शिवम दुबे 28 चेंडूत 24 रन बनवून नाबाद राहिला तर रवींद्र जडेजा ने 17 चेंडूत नाबाद 25 रन बनवले.

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे पण नक्की बघा :